Clcik to enlarge नमस्कार मंडळी, आपण सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !


"गुढी उभारूनी आकाशी
तोरण बांधुनी दाराशी!
काढूनी रांगोळी अंगणी
करू सुरुवात नववर्षाची!"

म्हणता म्हणता मंडळाचा २०१९ मधील हा सहावा कार्यक्रम! दर वर्षीप्रमाणेच आपल्या कार्यक्रमांची सुरुवात आपण Gleaners volunteer event ने केली. मिशिगनच्या कडाक्याच्या थंडीतही आपली young volunteer मंडळी अगदी उत्साहाने आली होती. कित्येक टन याम पॅक करून गरजूंना ते पाठवण्यात आलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकात कम्युनिटीसाठी काम करणं हे किती महत्त्वाचं आणि तेवढंच समाधान देणारं आहे याची प्रचिती सर्वांना आली.

दुसरा कार्यक्रम हा संक्रांतीचा! मृदुला दाढे जोशी यांच्या "मृदुल स्वर" या मराठी आणि हिंदी संगीतावर आधारित अतिशय अभ्यासपूर्ण माहितीसहित गाण्यातील सौंदर्यस्थळे शोधायची एक कलाच शिकायला मिळाली.

यानंतर कॅरम स्पर्धेचे आयोजन १६ फेब्रुवारीला केले होते. त्यात लहान मोठे अश्या ३८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. टोरोंटो, ओहायो येथून खास खेळण्यासाठी लोक आले होते. ही स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. त्यात सिंगल्समध्ये रणजित सप्रे विजेता तर वेणू मुकेरा उपविजेता ठरला आणि डबल्समध्ये अन्वर आणि हॅरिस ह्यांना विजेतेपद मिळाले तर सतीश दुपाटी आणि वेणू मुकेरा ह्यांनी उपविजेतेपद पटकावले. ह्या स्पर्धेचे प्रथमच फेसबुक लाईव्ह वरून प्रक्षेपण करण्यात आले.

यावर्षीच्या "रसिका तुझ्याचसाठी" या मालिकेची सुरुवातही जोरदार झाली. Design of Meaningful Artifacts हे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट डिझाईन वर आधारित जीवक बडवे याचे प्रेझेंटेशन खूपच माहितीपूर्ण होते. आपल्या आजूबाजूंच्या वस्तू वाप्ररून आपण एखादी नवीन डिझाईन निर्मिती कशी करू शकतो, या प्रक्रियेतील पायऱ्या कोणत्या याची माहिती मिळाली. याचा प्रश्नोत्तराचा भागही खूप छान झाला. पारंपरिक कलेला फाटा देऊन सायन्स वर आधारित असा हा कार्यक्रम एकदम हटके ठरला. याच सेरीजमधील पुढचा कार्यक्रम रविवार १२ मे रोजी कॉस्टिक सेंटर, फार्मिंगटन हिल्स येथे होणार आहे. ह्यात श्री. देवदत्त कुलकर्णी "तू माझा सांगाती" हा ज्ञानेश्वरीवरील त्यांच्या अभ्यासावर आधारित निरूपण आणि प्रश्नोत्तरे असा हा कार्यक्रम असेल. सौ. मृणालिनी अर्काटकर ह्याचे पसायदान आपल्याला ऐकायला मिळेल.

यंदा आपण भारतातून "अमर फोटो स्टुडिओ" हे प्रायोगिक रंगभूमीवरील नाटक आणले होते. त्याला ५१९ तिकिटविक्री होऊन उच्चअंकी प्रतिसाद मिळाला. तीन पिढयांना खिळवून ठेवणारे हे नाटक डेट्रोईटच्या चोखंदळ प्रेक्षकांकडून वाहवा मिळवून गेले. एवढेच नव्हे तर अमेरिकेत वाढलेल्या तिसऱ्या पिढीलाही ते आवडले हे विशेष!!

आपली यंदाची युथ कमिटी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करीत आहे. मुव्ही नाईट २९ मार्च रोजी दर वर्षीप्रमाणे राचमाले यांचेकडे आहे. सर्व मुले अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.

या वर्षी आपण प्रथमच "हेल्थ इज वेल्थ" ही सिरीज चालू करीत आहोत. ह्या अंतर्गत २२ जून ह्या इंटरनॅशनल योग दिवसानिमित्ताने योगथॉन आयोजित केले आहे. तरी सर्वांनी ह्यात भाग घेऊन लाभ घ्यावा ही विनंती. तसेच यंदा पिकनिक २० जुलै रोजी केन्सिंगटन पार्क येथे होईल. ह्याच्या मेनूचे प्लांनिंग आत्तापासूनच चालू झाले आहे.

आत्तापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांना लाभलेल्या तुमच्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादामुळे आमचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. आमचे सर्व कार्यकर्ते आपापले व्याप सांभाळून मंडळाच्या कामाला वाहून घेत आहेत. दिवसेंदिवस मंडळाच्या कार्यक्रमांची क्वालिटी अशीच उंचावत जावी आणि आमच्या नवनवीन उपक्रमांना आपली उपस्थिती लाभावी ही सदिच्छा!

आपली विश्वासू

भारती मेहेंदळे
अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉईट
ई-मेल bharati.mehendale@mmdet.org
फोन ७३४-६७४-३६८७


Lakeshore Global
Dhake Industries
Thanedar Foundation
ShilpEntertainment
Taal Academy

Community Links
Marathi Learning
ILA
Miindia
MaiFamily
Miindia
If you want to subscribe for MMD mass email, send email to mmofdetroit@mmdet.org with subject "Subscribe"
To unsubscribe from this group and stop receiving emails send an email to mmofdetroit@mmdet.org with subject "Unsubscribe"
© Maharashtra Mandal of Detroit. Send your feedback to admin@mmdet.org