Marathi Shala

Marathi Shala is one of BMM’s most successful initiatives and is run by many North America Marathi Mandal’s and Aaple Mandal MMD is proud to bring it to Detroit area!!

Marathi Shala is conducted in 2 venues- Troy, MI and Canton, MI . 

Registration open for any child (Member/Non-Member) between 5-18 years of age.

Registration for Academic year 2024-2025 is now OPEN !!

Register here for Academic year (2024-2025).

 

Troy Shala

Troy, MI
Venue: Bharatiya Temple, Troy MI – 6850 N Adams Rd, Troy, MI 48098
Timings: Sunday, 4-5:30 pm.

ट्रॉय मराठी शाळा – 

Diwali 2023 – Photos here and Video here

रविवारची सुरुवात काहीतरी रडतच झाली होती. क्रिकेटच्या मॅचचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पहाटे तीन वाजता उठून अगदी खुशीने मॅच बघायला सुरुवात केली सकाळी साडेपाच सहाला डोक्यावर पांघरून घेऊन आता तरी खेळ चांगला होईल याची वाट बघितली . ती वेळ आलीच नाही. मग कोणाकोणा च्या नावाने खडे फोडत कामाला सुरुवात केली.
दुपारी प्राजक्ताने व्हाट्सअप वर निरोप पाठवला मॅच संपली आहे कामाला लागा. साडेतीन पर्यंत सगळ्यांनी देवळात या.
दुपारी चार च्या दरम्यान शाळेत मुलं येऊ लागली. नवीन छान छान कपडे घालून खुशीने आज आली होती. प्रार्थना झाल्यावर मुलांना सांगितले की आपापल्या वर्गात न जाता आज आपण दिवाळी इथे साजरी करूया . त्यावर त्यांनी जो काय आनंदाने जल्लोष केला त्याच्यावरून आम्हाला भारत जिंकल्याचे समाधान मिळाले.
दिवाळीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिसरीच्या मुलांनी सगळ्यांना दिवाळीची माहिती सांगितली, चौथीच्या मुलांनी वेगवेगळे पदार्थ कसे बनवतात याची माहिती दिली. चकलीच्या भाजणीत ओवा आणि तीळ घातला तरच चकलीला स्वाद आणि खुसखुशीतपणा चांगला येतो हे मला काल चौथीच्या मुलांकडून कळले. पाचवीच्या मुलांनी त्यांच्या दिवाळीच्या आठवणी सांगितल्या आणि चौथीच्या मुलांनी किल्ल्यांबद्दल सुद्धा माहिती दिली. त्यानंतर सर्व मुलांकडून एलईडीचे छोटे दिवे वापरून कागदाच्या पणत्या करून घेतल्या . मुलं एकदम खुशीत उड्या मारत सगळ्यांना ते दिवे दाखवत होती. हॉलचे दिवे बंद करून पणत्या ओवाळून दिवाळीच्या शुभेच्छा जोरात दिल्या. त्यानंतर मुलांनीच आणलेला फराळ सगळ्यांनी वाटून खाल्ला . दोन अडीच तास इतके मजेत गेले की सकाळची क्रिकेटची मॅच आम्ही केव्हाच विसरून गेलो होतो.

वार्षिक स्नेहसंमेलन 2023 Photos Here
Pandemic नंतर प्रथमच ट्रॉय मराठी शाळेनी ने वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करायचा ठरवलं आणि मग काय सर्व शिक्षक मुलांसह तयारीला लागले. गेले २ महिने अभ्यासाबरोबरच वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी ही जोरात चालू होती . शेवटी आज तो दिवस आला आणि दुपारी ३ वाजता सर्व मुले नटून थटून वेशभूषा करून मंदिरात आली.
कार्यक्रमाची सुरवात ट्रॉय मराठी शाळेच्या संचालिका प्राजक्ता केतकर ह्यांनी केली. तसेच वेळात वेळ काढून महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईटच्या President शीतल सोनार आणि Vice-President मानसी डहाणूकर ह्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली .
तिसरी (अ) च्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाला वंदन करून ‘गणेशोत्सव’ हा कार्यक्रम सादर केला. बालवर्गातील मुलांनी ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ आणि ‘छान किती दिसते फुलपाखरू’ ह्या गाण्यावर नृत्य केलं आणि स्टेजवर छोटी छोटी फुलपाखरे भिरभिरली. तर , पहिली ( अ ) च्या मुलांनी ‘बाहुली माझी छान ग’ आणि ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ ही गाणी सादर करत चॉकलेटच्या बंगल्याची सैर करवून आणली .
पु . ल . देशपांडे , कुसुमाग्रज , शांता शेळके , नारायण सुर्वे ह्या लेखकांवर सुंदर भाषणं देऊन मुलांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
‘शोधिसी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी’ हे गाणं दुसरी (अ ) च्या मुलांनी अर्थासकट सादर केले . महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांचे महत्व चौथीच्या मुलांनी पटवून दिले.
रंगदेवतेला वंदन करून तिसरी (ब) च्या मुलांनी दिलीप प्रभावळकर ह्यांचे “पंपू आजारी आहे ” हे नाटक सादर केले . वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे नुसती गाणी आणि भाषणं असून कसे चालेल? नृत्य तर पाहिजेच ना!
‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा , प्रणाम घ्यावा हा माझा महाराष्ट्र देशा’ ह्या सुंदर गाण्यांवर पहिली (ब ) च्या मुलांची पावलं थिरकली. ‘उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला’ ह्या देशभक्ती गाण्यावर दुसरी (ब ) च्या मुलांनी नृत्य सादर केले.
मेधा साठे ह्यांनी सुंदर आवाजात पसायदान म्हणून ह्या कार्यक्रमाची सांगता केली .
बरं का मंडळी , ह्या सर्व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःवर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली. आणि हो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ‘cheer -up’ करायला आई -वडील ,आजी -आजोबा, मित्र -मैत्रिणी उत्साहाने स

Please find HERE the link for News article by वसुधा नाईक थेट यूएसए हून

Troy school Ganapati 2022 Video

 

 
Canton Shala: 
Canton, MI : 
Venue: Hindu Temple of Canton, Canton-MI – 44955 Cherry Hill Rd, Canton, MI 48188
Timings: Sunday, 4-5:30 pm.

Canton मराठी शाळा – दिवाळी 2024 – Video link

“कँटन मराठी शाळा” दिवाळी २०२४

दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी कँटन मराठी शाळेचे दिवाळी celebration धुमधडाक्यात साजरे झाले!

दर रविवारच्या शाळेतील अभ्यासाला सुट्टी देऊन सगळी मुले, शिक्षक छान भरजरी कपड्यांमध्ये कॅंटन हिंदू temple मधे जमले होते आणि दिवाळीचा उत्सव सर्वांनी आनंदात साजरा केला.दिवाळीबद्दल, त्यातल्या स्वादिष्ट फराळाबद्दल आणि आकाशकंदील, पणती, फुलबाजी अशा नानाविध दिवाळीशी संबंधित वस्तूंची माहिती मुलांनी “show and tell” मार्फत सांगितली.बालवर्ग आणि पहिलीचे विद्यार्थी त्यानंतर “ठिपक्यांची रांगोळी” शिकण्यात रमून गेले आणि मग त्यात रंग भरून सर्वांनी रांगोळीची सुंदर कलाकृती बनवता बनवता, दिवाळी-रांगोळी अशी सगळ्या “आळ्यां”ची गंमत समजून घेतली.दुसरीपासून पाचवी पर्यंतच्या मुलांनी “दिवाळी special Bingo” खेळला आणि उभ्या-आडव्या “आळी”तली चित्र पूर्ण करून बक्षिसे पटकावली. मंदिरामध्ये ७० मुलांनी साचेबद्ध “आळी” मधे उभं राहून “दिवाळी” निमित्त सरस्वती प्रार्थना, सुखकर्ता दुखहर्ता आरती आणि गुरुजींबरोबर ॐ जय जगदीशाची पण आरती केली.शाळेतर्फे सर्वांना दिवाळी भेट म्हणून मराठी स्वाध्याय पुस्तिका आणि मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले.

शाळेच्या दिवाळी कार्यक्रमाची तयारी उत्तमरित्या केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन आणि आभार🙏

कार्यक्रमासाठी आर्थिक पाठबळ आणि venue ची मदत केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉईट (MMD) आणि कँटन हिंदू templeचेही आभार 🙏

पुढील दिवाळीपण आपणा सर्वांना अशीच मंगलमय आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा!

–  अभिजीत जोगदेव

(कॅंटन मराठी शाळा मुख्याध्यापक)

Canton मराठी शाळा – वार्षिक स्नेहसंमेलन 2024 – Video link and Photo Link and Beautiful writeup here

Canton Shala- ‘जागतिक मराठी भाषा दिन’ Sunday March 3rd, 2024: Video Here and a Beautiful write up here.

Canton Shala- Tulashicha Lagna 2023. Exciting details of wedding HERE. Photos HERE. Video of this beautiful wedding HERE.

Canton मराठी शाळा – वार्षिक स्नेहसंमेलन 2023 Youtubelink Here

Canton Ganapati Celebrations : Ganapati 2022 Video1Ganapati2023 Video 

 

 


MMD Marathi Shala is open to all MMD Members as well as Non-Members.

Please contact us at marathishala@mmdet.org for more information. Your feedback is valuable to us.

We are also looking for volunteers who can help us in this initiative. If you can volunteer as a teacher or teacher assistant, please email at marathishala@mmdet.org.


Videos – Troy Shala

 































Jagatick

Scroll to Top